महसुल विभागाच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:- महसूल विभागातील पदे भरती व पदोन्नतीच्या महत्वपूर्ण मागणीस्तव आज ४ एप्रिल रोजी तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद वाघ यांच्या नेतृत्वात बेमुदत संप करण्यात आला. यामध्ये महसूल विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे या विभागातील कामकाज आज पूर्णतः ठप्प झाले आहे,महसूल विभागातील अधिकारी संवर्गातील नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती करण्याबाबत तसेच अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांच्या जेष्ठता याद्या

राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबतचे पत्र रद्द करण्यासाठी व इतर महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासन मिळत असल्याने व आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे जी. जी. बोरले, एम. पी. सातव, सी पी पाटील, जी एम सिसोदे, एल पी चिरावंडे, ऐ.जी. राजपूत, पी एन इंगोले, श्रीमती आर एस तांदूळकर, अंजली पवार, बी सी कुलकर्णी, शुक्ला मॅडम, जे डी पाटील, एस व्ही सपकाळ आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेमार्फत शासनास दि.21 फेब्रु 22 रोजी नोटिस देण्यात आली असून सदर नोटिस दरम्यान खालील आभ्यासनांची पूर्तता न केल्याने महसुल कर्मचारी संघटना तालुका शाखा मलकापूर दि. 04 एप्रिल 22 रोजीपासून होणा-या बेमूदत संपात सहभागी होत आहे.१) राज्यातील महसूल विभागात महसुल सहाय्यकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त असून एका महसुल सहाय्यकाकडे २ ते ३ संकलनाचा अतिरीक्त कार्यभार आहे.

त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसुल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करणेस टाळाटाळ होत आहे.२) अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसून येते.

शासन निर्णय महसूल व वनविभाग दि.10 मे 2021 अन्वये नायब तहसिलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवाजेष्ठता यादया राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे.

परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे यांच्या यादया राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद करावे.तसेच इतर मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही आश्वासन मिळत असून आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने

नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत आहे. करिता मलकापूर तालुका महसुल कर्मचारी संघटना तालुका शाखा मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय मलकापूर येथील सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणी महसुल कर्मचारी दि.04 एप्रिल पासून बेमुदत संपात सहभागी होत आहेत.

महसुल कर्मचारी संघटना तालुका शाखा मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय मलकापूर येथील सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणी महसुल कर्मचारी दि.04 एप्रिल 22पासून बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.