कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची कॅम्पस साठी झुंबड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने सिव्हिल इंजिनिअरिंग करिता आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये आर. के. संचेती इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टर या नामांकित कंपनीने सिव्हिल इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे,

या निवड झालेल्या विद्यार्थ्या मध्ये कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयासह इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सुद्धा निवड झाली आहे, कोलते महाविद्यालय हे आपल्या विद्यार्थ्यांसोबत एक सामाजिक जाणीव म्हणून बाहेरील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुध्दा नोकरीचे दालन उघडे करून देत आहे.

अशी माहिती कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विध्यार्थ्यानी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीची प्रचंड महत्वाकांक्षा होती. चांगले गुण असल्यामुळे येथे प्रवेश मिळाला आणि आमचे पालक निश्चिन्त झाले. कारण येथुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देण्याचे काम कॉलेजच करते हे आम्हाला माहित होते. या अनुषंगाने प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला महाविद्यालयाची शिक्षण व परीक्षा पध्दती, राबविण्यात येणारे उपक्रम या सर्व बाबींची माहिती देण्यात आली होती. आणि सांगीतल्या प्रमाणेच आमच्याकडून तयारी करून घेतली.

अनेक तंज्ञांचे मार्गदर्शनही मिळाले. या सर्व बाबींमुळे आम्ही मुलांखतींमध्ये यशस्वी होवु शकलो आणि चार वर्षांपूर्वी आम्ही व आमच्या आई-वडीलांनी डोळ्यात साठवलेले नोकऱ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. या संधीचे आम्ही सोने करू व नोकरीच्या ठिकाणी अद्ययावत ज्ञान घेवुन कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व पालकांचे नाव उज्वल करू, असे भावुक होवुन सांगीतले.

कॅम्पस ड्राइव्ह कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मयुरी पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे एच.आर. यश संचेती महाविद्यालयातील  ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापिका नितीशा अचमेलवर सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. सरोदे, प्रवीण पाटील, पराग चोपडे, ज्योती पाटील, गजेंद्र नारखेडे, स्नेहल पवार आदींनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.