Friday, December 9, 2022

अश्लील फोटो काढून शरीर सुखाची मागणी; आरोपी जेरबंद

- Advertisement -

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

तालुक्यातील ग्राम दाताळा येथील २२ वर्षीय तरुणीशी औरंगाबाद येथे खाजगी क्लासेसमध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करुन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर नको त्या अवस्थेतील फोटो काढून फोटो इन्स्ट्राग्रामवरुन व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी शरीर सुखाची मागणी करून ब्लॅकमेल करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ग्राम दाताळा येथील २२ वर्षीय तरुणी ही औरंगाबाद येथील खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत असताना रामकिसन बबन पुंगळे (वय 30 रा. राजुर गणपती ता. भोकरदन जि. जालना, हल्ली मुक्काम रायकर मळा, गोरखनाथ मंदिराजवळ, धायरी, पुणे) याचेशी ओळख झाली.  ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

- Advertisement -

तसेच तरुणीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते फोटो इन्स्ट्राग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरी संभोग केला. तसेच दि. १५ जानेवारी २२ रोजी तरुणीच्या दाताळा येथील राहत्या घरी येऊन घरात घुसून तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

फिर्यादीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मोबाईलवरुन लाॅगीन करुन फिर्यादी व त्याचे फोटो इन्स्ट्राग्राम अकाउंटवर अपलोड केले. तसेच फिर्यादी सोबत काढलेले फोटो हे त्याचे व्हाट्सअप अकाउंट वर ठेवतो अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून मलकापुर ग्रामीण पोस्टेला दि.10 एप्रिल 22 रोजी रामकिसन बबन पुंगळे याचे विरुद्ध कलम 376,376 (2), (न),452,506,भादवी सह कलम 66 ई माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यापासून शोधार्थ आलेल्या पोलीसांना रामकिसन हा सहा महिन्यापासून गुंगारा देत होता. ग्रामीण पोलीस निरीक्षक एफ सी मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.10 नोव्हेंबर रोजी पोहेकाॅ उल्हास मुके, नापोकाॅ रघुनाथ जाधव, नापोकाॅ प्रमोद पोलाखरे,पोकाॅ सचिन दासर या तपास पथकाने रामकिसन बबन पुंगळे यास पुणे येथुन  मोठ्या शिताफीने अटक केली.

त्याला दि. 12 नोव्हेंबर रोजी मलकापुर येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची दि.16 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक एफ.सी. मिर्झा करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या