तुर काढणीयंत्रात अडकल्याने तरुणाचा मृत्यू

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुर काढणीयंत्र हेडंबच्या दात्यात अडकून पायासह शरीराचा कमरेखालील भागाचा चेंदामेंदा झाल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तालुक्यातील मौजे भालेगांव शिवारात शनिवारी दुपारी ही घटना घडली.

तालुक्यातील मौजे भालेगांव येथील रहिवासी गौरव उर्फ पवन श्रीहरी बावसकर (वय १८) हा शेतातील तुर तयार करीत होता. त्यासाठी तो तुर काढणीयंत्र हेडंबवर बसला होता. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास संपूर्ण तुर काढणी संपण्याच्या मार्गावर होती. शेवटचा काही पालापाचोळा टाकण्याचा प्रयत्न गौरवने केला. त्यात त्याचा पाय हेडंबमध्ये अडकला त्यामुळे त्या यंत्राने शरिरासह त्याला आत ओढले.

पाहता पाहता हेडंबच्या दात्यात अडकल्याने गौरवच्या पायासह कमरेखालील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. व गंभीर जखमी झालेल्या तरुणास मलकापूरात खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले. मात्र जखमीची अवस्था अधिक खालावल्याने गौरवचा म्रुत्यु झाला.

घटनेनंतर भालेगांव येथील असंख्य नागरिक दवाखान्यात दाखल झाले. तरुणाच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.