राष्ट्र विकासात युवकांची भूमिका महत्वाची: डॉ. अरविंद कोलते

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन दिनांक ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत दत्तक ग्राम अनुराबाद येथे करण्यात आले असून गुरुवार १० मार्च रोजी शिबिराचे उद्धाटन महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्धाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अनुराबाद ग्राम चे सरपंच ज्ञानदेव ढगे, अनिल इंगळे,बंडूभाऊ चौधरी, संजय बोरले, विनोद बिराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी किशोर भगत यांनी शिबिराचा उद्देश, दिनचर्या आणि जनजागृती कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्धाटक डॉ. अरविंद कोलते यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, कोविड लसीकरण, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता संदेश जनजागृती यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. आजचा युवक उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य असून, राष्ट्राच्या विकासात त्याची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले.

प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच समाज कार्यकर्त्यांची भूमिका कशी मांडावी याविषयी मार्गदर्शन केले. या उद्धाटन कार्यक्रमाला प्रा. अरविंद हिरोळे, रुचिता नाले हे मार्गदर्शक तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे स्वयंसेवक, स्वयंसेविका  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय गावंडे तर आभार प्रदर्शन सुमेध नरवाडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.