टँकर ट्रेलरच्या धडकेत वाहनाला आग; दोन्ही चालक जागीच जळून खाक

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नॅशनल हायवे क्रमांक सहावर ग्राम वडनेर (भोलजी) नजीक टँकर व ट्रेलर वाहनांमध्ये समोरा समोर धडक होऊन दोन्ही वाहनाला आग लागून दोन्ही चालक जागीच जळून मरण पावल्याची घटना 5 एप्रिल रोजी चांदुर बिस्वा फाट्याजवळ रात्री अकराच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदुर बिस्वा फाट्याजवळ टँकर व ट्रेलरचा अपघात झाला. या दोन्ही गाड्यांना आग लागली अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मलकापूर कडून नांदुराकडे जाणारे टँकर क्रमांक जि.जे. 04 ए डब्लू 2191 व नांदुरा कडून मलकापूर कडे जाणारा ट्रेलर क्रमांक आर जे 09 जी.बी. 1503 हे समोरासमोर धडकले असून दोन्ही वाहनांना आग लागली.

या आगीमध्ये ट्रेलरचा चालक व टँकरचा चालक दोघेही कॅबिनमध्ये पूर्णपणे जळून मरण पावले. सदर अपघात ट्रेलर आर जे 09 जी . बी 1503 चा चालक उन डब्ल्यू 2191 चा चालक हे स्वतःचे मरणास व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत असे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. फिर्यादी वरून दोन्ही चालकाविरुद्ध कलम 279, 304 (अ) भादवि, सह कलम 184 मो.वा.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.