Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»“तिला वेश्या व्यवसाय करायला लाव” : मैत्रिणीचा दावा
    गुन्हे वार्ता

    “तिला वेश्या व्यवसाय करायला लाव” : मैत्रिणीचा दावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 13, 2025No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    हरियाणाच्या राधिका यादव हत्याकांडात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता राधिकाचे वडील दीपक यादव यांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. राधिकाच्या पाठीवल तीन आणि खांद्यावर एक गोळी लागली. या गोळीबारात राधिकाचा जागीच मृत्यू झाला. राधिका हत्याकांड प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. राधिकाची जिवलग मैत्रिण हिमांशिकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याद्वारे हिमांशिकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

    हिमांशिका व्हिडिओमध्ये सांगितले की, राधिकाचे वडील गेल्या तीन दिवसांपासून तिच्या हत्येचा कट रचत होते आणि या नियोजनाचा एक भाग म्हणून तिचा भाऊ आणि त्याचा कुत्रा घरापासून दूर ठेवण्यात आला होता जेणेकरून ते राधिकाला वाचवू शकणार नाहीत.’ काही लोकांचे म्हणणे ऐकून तिच्या वडिलांनी राधिकाची हत्या केल्याचा दावाही मैत्रिणीने केला आहे. त्या लोकांनी त्यांना राधिकाला वेश्याव्यवसाय करायला लाव असे टोमणे मारले होते.

    राधिकाच्या मैत्रिणीने दावा केला की, तिच्या वडिलांचा मित्र राधिकाच्या यशावर खूपच जळत होता. आता ती मेकअप करायला लागली, तोकडे कपडे घालू लागली, आता तू तिच्या पैशावर जगू लागला आहेस, आता तू तिला वेश्याव्यवसाय करायला लावायला हवे, अशा शब्दात काही लोकं राधिकाच्या वडिलांना टोमणे मारत होते.

    राधिकाच्या रील बनवण्याच्या मुद्द्यावरही हिमांशिकाने दावा केला की, ‘राधिकाच्या अकाउंटमध्ये फक्त ६८ लोक होते आणि तिने तिचे अकाउंट प्रायवेट केले होते. जर एखादी व्यक्ती रील बनवते तर त्याच्या अकाउंटवर इतके कमी फॉलोअर्स नसतात. मी तिला ओळखत होतो. ती खूप चांगली मुलगी होती.’

    राधिकाच्या वडिलांनी अटकेनंतर पोलिसांना सांगितले की, माझ्या हातून मोठी चूक झाली. मी कन्यावध केला. मला फाशी द्या. लोकं मला मुलीच्या कमाईवर खातो असे टोमणे मारत होते. त्यामुळे मी खूप चिंतेत होतो. मी राधिकाला ट्रेनिंग स्कूल बमंद करण्यास सांगितले होते. पण तिने माझे ऐकले नाही त्यामुळे मी खूप चिंतेत होतो आणि मी तिची हत्या केली.’

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif