Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हातनुर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रील स्टार रोहिणीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट
    गुन्हे वार्ता

    रील स्टार रोहिणीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट

    पती निलेश पाराध्येच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments654 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रोहिणीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. रोहिणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती निलेश पाराध्ये याच्याविरोधात मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच रोहिणीने मृत्यूला कवटाळल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गेल्या २६ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास, ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये २५ वर्षीय रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या आत्महत्येभोवती मोठे गूढ निर्माण झाले होते.

    मात्र, मृत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (रा. अर्धनारी) यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

    दरम्यान, पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरनुसार (FIR), आरोपी पती निलेश हा रोहिणीला वारंवार टोमणे मारून मारहाण करायचा, तसेच तिला गंभीर परिणामांची धमकीही द्यायचा, असे नमूद करण्यात आले आहे. रोहिणीच्या वडिलांनी लावलेल्या या गंभीर आरोपांनंतर मंगळवेढा पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. या आत्महत्येपूर्वी त्यांच्यात नेमका काय वाद झाला होता आणि आरोपीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले का, यादृष्टीने पोलीस आता हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि रोहिणीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) खंगाळत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif