Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आर.सी.बाफना ज्वेलर्सकडून हिशोब पद्धतीत मोठा बदल
    जळगाव

    आर.सी.बाफना ज्वेलर्सकडून हिशोब पद्धतीत मोठा बदल

    ज्वेलरी विश्वात नवा अध्याय :  १९७४ पासून जपलेली पारदर्शकता आता नव्या रूपात ग्राहकांना थेट फायदा लागू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 26, 2026No Comments565 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ज्वेलरी क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुखता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांनी पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दागिन्यांच्या हिशोब पद्धतीत मोठा बदल जाहीर केला आहे. ही केवळ एखादी ऑफर किंवा योजना नसून, ग्राहकांना थेट फायदा होईल अशी नवीन हिशोब प्रणाली आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांनी मजुरीच्या हिशोबात आमूलाग्र बदल केला आहे. या नव्या पद्धतीमुळे ग्राहकांना दागिन्यांच्या मजुरीत मोठा आणि थेट फायदा होणार आहे. ही नवीन प्रणाली जळगावमधील सुभाष चौक व भवानी पेठ येथील शोरूममध्ये लागू करण्यात आली असून, ग्राहकांकडून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

    संस्थेची परंपरा १९७४ पासून सुरू झाली. शोरूमच्या स्थापनेपासूनच या संस्थेने वेळोवेळी सुवर्ण  व्यापारात ग्राहकांच्या हितासाठी आमूलाग्र बदल केलेत, सुरुवातीच्या काळातच १९७४ मध्ये स्वतःच्या ठिकाणी दागिन्यांचे उत्पादन सुरू करून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे १९८५ मध्ये शुद्धतेची हमी व रिटर्न पॉलिसी लागू करत ग्राहकांना लेखी विश्वास देण्यात आला. याच  वर्षी प्रत्येक दागिन्यावर मणी, रत्न व मोत्यांचे अचूक वजन नमूद करण्याची पारदर्शक पद्धत सुरू करण्यात आली.२००० साली पारंपरिक कसोटीऐवजी अत्याधुनिक कॅरेटोमीटर सुविधा सुरू करून ग्राहकांना वैज्ञानिक पद्धतीने सोन्याची शुद्धता तपासण्याचा अधिकार देण्यात आला. त्यानंतर २०१७ मध्ये शुद्धतेनुसार किंमत निर्धारण प्रणाली लागू करत ग्राहक केवळ वास्तविक मूल्यच भरत आहेत, याची खात्री देण्यात आली. “इथे विश्वास फक्त बोलला जात नाही… तो प्रत्येक व्यवहारात अनुभवायला मिळतो.” अशी माहिती सिद्धार्थ बाफना यांनी दिली.

    १९७४ पासून सुरू झालेल्या आमच्या प्रवासात आम्ही नेहमीच विश्वास आणि पारदर्शकतेला प्राधान्य दिले. आज, ५२ वर्षे पूर्ण करताना आम्ही नफा वाढवण्याचा मार्ग न निवडता, तो कमी करून त्याचा थेट फायदा ग्राहकांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजच्या काळातही १९७४ च्या तुलनेत कमी नफ्यावर काम करण्याची ही भूमिका आमच्या ब्रँडला देशभरात खऱ्या अर्थाने वेगळेपण देते.
    सिद्धार्थ रतनलाल बाफना
    संचालक

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif