Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»नितेश कराळे मास्तरांना पोलिसांचा मोठा दणका
    राजकारण

    नितेश कराळे मास्तरांना पोलिसांचा मोठा दणका

    सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य पडले महागात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 27, 2026No Comments430 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    वर्ध्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नितेश कराळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यानंतर वर्धा शहर पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर यांना वर्धा शहर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. कराळे यांनी सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी नितेश कराळे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. नितेश कराळे यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

    वर्ध्यातील नितेश कराळे हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. कराळे यांच्या भाषणाचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. ते मजेदार शैलीत राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करत असतात. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. कराळे हे पेशाने शिक्षक आहेत. राजकारणाच्या आवडीमुळे त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आता हेच कराळे मास्तर अडचणीत सापडले आहेत.

    कराळे मास्तर यांनी मागच्या वर्षी कुंभमेळ्यावरील खर्चावर भाष्य केलं होतं. कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटींचा खर्च करण्यात येतो, हा फालतू खर्च आहे. तसेच कुंभमेळ्यात साधू हे गांजा फुकण्यासाठी येतात, असं वक्तव्य कराळे मास्तर यांनी केलं होतं. कराळे यांच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेने तक्रार दाखल केली होती. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif