Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई
    गुन्हे वार्ता

    MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई

    अपर सचिवासह अनेकांना अटक, रॅकेटचा संशय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 26, 2026No Comments237 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अपर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच अटक झाल्याने प्रशासन आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

    औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरतीसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर मुलाखतीसाठी 506 उमेदवार पात्र ठरले होते.

    1 जुलै ते 22 जुलै 2026 या कालावधीत 488 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर 485 पात्र आणि 3 अपात्र अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

    या पेपरफुटी प्रकरणात अपर सचिव अभिजीत लेंडवे यांच्यासह आयोगातील दोन सहायक कक्ष अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीतील कथित सूत्रधार अमृत पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलची भूमिका देखील तपास यंत्रणांच्या संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याला अद्याप अटक झालेली नाही.

    या प्रकरणात पेपर तब्बल 40 लाख रुपयांना विकण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे ही घटना केवळ एका व्यक्तीच्या पातळीवरील गैरप्रकार नसून त्यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पेपरफुटीमागे प्रेमसंबंधाचा एक कथित अँगल समोर आला असला, तरी तो संपूर्ण प्रकरणाचा केवळ एक भाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आयोगातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे पेपरफुटीचे जाळे नेमके किती खोलवर आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    MPSC सारख्या राज्यातील महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्येच पेपरफुटी होत असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अशा घटनांचा थेट परिणाम होतो. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे.

    अपर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पेपर नेमका कुठून फुटला, तो कोणाला आणि किती पैशांत विकला गेला, तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणकोणते अधिकारी किंवा व्यक्ती आहेत, याचा तपास झाल्यानंतर धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif