Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»23 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुख्य एजंट ताब्यात!
    जळगाव जिल्हा

    23 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुख्य एजंट ताब्यात!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2026No Comments604 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव पोलिसांची कामगिरी : तिनशे गुंतवणूकदारांची फसवणूक
    जळगाव –  गुंतवणुकीवर दरमहा मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल 279 गुंतवणूकदारांची सुमारे 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपयांची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. पुणे या कंपनीचा जळगाव पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचा जळगाव शाखेचा मुख्य एजंट मिलिंद शालिकराव पाटील (41, रा. शिव कॉलनी, जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
    आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात या घोटाळ्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत संशयितांनी शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. शहरासह विविध भागांत मोठमोठे सेमिनार, बैठका आणि प्रचार कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना अल्पावधीत मोठा आर्थिक फायदा मिळेल, अशी खात्री दिली जात होती. टीडब्ल्यूजे असोसिएट्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा आकर्षक परतावा मिळेल, अशी भ्रामक माहिती देत गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर ठेव योजना राबवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुंतवणूकदारांना बनावट करारनामे, उच्च परताव्याची आश्वासने आणि कंपनीच्या वाढीव नफ्याचे सादरीकरण करून विश्वासात घेतले जात होते. अनेकांनी आपली आयुष्यभराची बचत, निवृत्ती वेतनाची रक्कम आणि कर्ज काढूनही गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेला मिलिंद पाटील याने सुरुवातीला स्वतःच कंपनीच्या संचालकांविरुद्ध तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला असता, पाटील हाच कंपनीचा जळगाव फ्रँचायझी प्रमुख म्हणून कार्यरत असल्याचे उघड झाले. तो गुंतवणूकदारांकडून थेट पैसे स्वीकारत होता, करारनामे करून देत होता तसेच गुंतवणूक वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत होता. या बदल्यात त्याला मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
    पोलिसांनी तपासादरम्यान अनेक आर्थिक व्यवहार, बँक खात्यांतील हालचाली, करारपत्रे आणि गुंतवणूकदारांचे निवेदन तपासले. त्यातून मिलिंद पाटीलचा सक्रिय सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू केली असून या घोटाळ्यात आणखी काही एजंट आणि सहकारी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध शहरांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 30 जानेवारी 2026 रोजी ठाणे पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.

    फसवणुकीची रक्कम वाढणार?
    या प्रकरणी पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 14 मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असून, गुंतवणूकदारांची संख्या आणि फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था सेबी किंवा इतर नियामक संस्थांकडे नोंदणीकृत आहे का, याची खात्री करूनच व्यवहार करावेत, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif