Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»जळगावातील महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; महिलेवर एमपीडीएची पहिली घटना…
    ब्रेकिंग

    जळगावातील महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; महिलेवर एमपीडीएची पहिली घटना…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 2, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    शहरात आज एक मोठी घटना समोर आली आहे. ज्यामुळे शहराचे नाव संपूर्ण राज्यात घेतले जात आहे. हरिविठ्ठल नगरातील ५० वर्षीय महिलेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत तिला स्थानबद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात महिलेला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याची ही पहिलीच घटना आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हरिविठ्ठल नगर परिसरात धनुबाई उर्फ धन्नो नेतलेकर ही महिला बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून परिसरात विक्री करते. या प्रकरणी तिच्यावर गुन्हेदेखील दाखल आहेत. हे प्रकार थांबावे म्हणून या महिलेवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील दारुविक्री सुरूच होती. त्यामुळे परिसरातील तरुण पिढीत व्यसनाधीनता वाढत असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी धन्नो नेतलेकर हिच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठविला. त्यानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी त्याचे अवलोकन केले. त्यानुसार या महिलेला स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले. या महिलेला अकोला मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

    शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, पोकॉ उमेश पवार, ईश्वर पाटील, इरफान मलिक. राजश्री पवार आदींनी कारवाई केली.

    #crime #police jalgaon mpda
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif