महिला दिना निमित्त एकलव्य क्रीडा संकुलात विविध क्रीडा स्पर्धां

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकलव्य क्रीडा संकुल जळगांव व जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने एकलव्य क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर ०८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी एकलव्य क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खेळाडूंच्या महिला पालकांकरिता मैदानी खेळ, संगीत खुर्ची या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील जलतरण, स्केटिंग, जिम्नॅस्टिक्स, रायफल व पिस्तोल शूटिंग तसेच स्क्वॅश या क्रीडा विभागातील खेळाडू व ५८ महिला पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्याक्रमचे सूत्रसंचालन एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सरांनी केले. याप्रसंगी महिला पालक प्रतीनिधी स्मिता नंदकिशोर देवरे, दीपमाला जयंत चौधरी, मीनल विशाल इंगळे व रेश्मा सतीश खडके यांच्या व्दारे महिला विजेत्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

५० मीटर रनिंग स्पर्धेत
प्रथम हिट मध्ये – तृप्ती सोगटी (प्रथम), प्रियंका सरोदे (व्दितीय)दुसऱ्या हिट मध्ये – मयुरी गचके (प्रथम), लीना चौधरी (व्दितीय)तिसऱ्या हिट मध्ये – मधुरा गाडे (प्रथम), कामिनी धूत (व्दितीय) चौथ्या हिट मध्ये – वर्षा वंजारी (प्रथम), मनीषा पाटील (व्दितीय)

संगीत खुर्ची स्पर्धेत

रुचिता यश पाटील (प्रथम), तृप्ती सोगटी (व्दितीय), कामिनी धूत (तृतीय) व लीना फिरके, दीपमाला चौधरी, कविता ढगे व नीलिमा पाटील हे पालक विजेते ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. रणजित पाटील, प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रविण कोल्हे, सागर सोनवणे, योगेश चव्हाण, शंकर ठाकूर, सुकदेव सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम हा डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.