Wednesday, August 10, 2022

महिला आरक्षणाचे श्रेय काॅग्रेसला-बी.एम्.संदिप

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

 ठाणे: देशातील सर्वप्रथम 33 टक्के व नंतर 50 टक्के महिलाचं आरक्षणाचं श्रेय काॅग्रेसचे असून देशाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग असावा अशीच भूमिका पहिल्यापासूनच काँग्रेसची राहीली आहे आपन स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल असे उद्गार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव व कोकण विभाग प्रभारी बी.एम् संदिप यांनी ठाण्यात बोलताना काढले.

आगामी ठाणे महापालिका निवडणुक पार्श्‍वभूमीवर ठाण्यातील महिला काँग्रेसच्या वतीने” “मै लडकी हू,मै लढ सकती हू” चा नारा देत वर्तकनगर येथे काॅग्रेस पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छित असणा-या सर्व महिला उमेदवार व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या प्रसंगी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सचिव व महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल,ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व ठाणे प्रभारी संतोष केणे,चंद्रकांत पाटील,प्रदेश समन्वयक विनीता व्होरा,ठाणे महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली भोसले,प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष जर्नल कलावत,माजी आमदार जेनेट डीसोझा आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सोनल पटेल यांनी सांगितले येत्या काही महिन्यांतच   महापालिका निवडणुका होत असेल 50 टक्के महिला आरक्षण असल्यामुळे काँग्रेसच्या महिला उमेदवार एक दृढसंकल्प घेऊन सक्षमपणे निवडणुकाना सामोरे गेले पाहिजेत हाच उद्देश असल्याचे सांगून अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर संपूर्ण राज्यभर होणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सागितले.

या प्रशिक्षण शिबिरात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून  प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये निवडणूक,प्रचार यंत्रणा,जाहिरनामा,आधुनिक प्रचार यंत्रणा,कागदपत्र पूर्तता,प्रभावी वकृत्व आदि व निवडणूक संदर्भात काँग्रेसचे देश पातळीवरील प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या