Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महावितरण कार्यालयात दिव्यांग दिन’
    जळगाव

    महावितरण कार्यालयात दिव्यांग दिन’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 3, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महावितरण कार्यालयात दिव्यांग दिन’

    कर्मचाऱ्यांना अनुकूलित वाहनांचे वाटप!

    जळगाव प्रतिनिधी महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात दि. ०३ डिसेंबर रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणमधील दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांना श्री आय.ए.मुलाणी मुख्य अभियंता यांच्या हस्ते अनुकूलित वाहनांचे वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने नंदूरबार मंडलातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

    बुधवारी झालेल्या या विशेष कार्यक्रमास मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्यासह जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, अधीक्षक अभियंता, पायाभूत आराखडा मनोज विश्वासे, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरुंगे, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर, चेतन नंदनवार कार्यकारी अभियंता (प्रशासन) जळगाव मंडल, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) गणेश लिधूरे, अमित सोनवणे व.व्यवस्थापक (विवले), तन्वी मोरे व्यवस्थापक (मासं) तसेच दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र सोनवणे यांच्यासह संघटने पदाधीकारी वर्ग व इतर सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यासोबतच दिव्यांग बांधवांबद्दल महावितरणची संवेदनशीलता व्यक्त करणारा एक विशेष कार्यक्रम यावेळी आयोजीत करण्यात आला.

    कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, यांनी महावितरणचे परिपत्रके वाटप करत मार्गदर्शन केले आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

    सन्मानित करण्यात आलेल्या दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांमध्ये विलास  पाटील, सहाय्यक अभियंता (नंदुरबार विभाग) . विठ्ठल  सुर्यवंशी, प्रधान तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) निकलेश  सोनार, वरिष्ठ तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) धनलाल दशरथ महाले, प्रधान यंत्रचालक (नंदुरबार विभाग)नंदलाल महाजन, प्रधान तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) सुनिल पाटील, वरीष्ठ तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) रतिलाल नथ्थु निकम, वरिष्ठ यंत्रचालक (शहादा विभाग) यांचा समावेश आहे.

    हा कार्यक्रम महावितरणची आपल्या कर्मचाऱ्यांप्रति असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी दर्शवणारा ठरला. सदरील कार्यक्रम सुधीर म्हसने उपकार्यकारी अभियंता, चेतन तायडे मुख्य लिपीक, जे.डी. पाटील मुख्य लिपीक यांच्या सहकार्याने पार पडला.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #mahavitran
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif