मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून उद्या निकाल आहे. त्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांनी विजयाचा दावा केला असला तरी निकाल आल्यांनतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान मुंबईत बुधवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मुंबईत हॉटेल हयात येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत निकालानंतर काय रणनीती असावी या बद्दल चर्चा झाल्याचे समजते.
हयात येतील बैठक आटोपून बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही चर्चा केली. तब्बल अडीच तास ही चर्चा झाली. त्यामुळे मुंबईत नेमकं चाललयं काय काय असा प्रश्न पडओय आहे. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर विजय महाविकास आघाडीचाच होईल असा दावा त्यांनी केला.
थोरात म्हणाले, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली असून त्यात आमच्या सर्वाधिक जागा येईल अस स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आम्हाला जुळवाजुळवीची गरज पडणार नाही. कुणाला आमच्या बरोबर यायचं असल्यास आम्हाला आनंद होईल. दरम्यान, निकाल स्पष्ट झाल्यावर आम्ही मुख्यमंत्री पदाबात चर्चा करू असे देखील थोरात म्हणाले.
नाना पटोले गैरहजर
महाविकास आघाडीच्या नेत्यांनची महत्वाची बैठक सुरू असतांना नाना पटोले या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील उपस्थित होते. मात्र, या बैठकीला नाना पटोले उपस्थित नव्हते. संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर मुख्यमंत्रिपदावरून टीका केली होती. त्यानंतर पटोले यांनी बैठकीला दांडी मारल्याने महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे, या बाबत चर्चा सुरू झाली आहे.