महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय
मुंबई प्रतिनिधी देशभरातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी गेला असला तरी, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात हवामानात बदल होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांतील पूरस्थिती आणि नुकसानीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
हवामान विभागाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील ५ दिवस राहणार आहे. या काळात राज्यातील विविध भागांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय पावसाचा अंदाज
२१ ऑक्टोबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली — येलो अलर्ट
२२ ऑक्टोबर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा — येलो अलर्ट
२३ ऑक्टोबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली — येलो अलर्ट
२४ ऑक्टोबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली — येलो अलर्ट
२५ ऑक्टोबर
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव तसेच संपूर्ण विदर्भ — येलो अलर्ट
पावसामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकांना आणि फळबागांना नुकसान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांना पिकं सुरक्षित ठेवण्याचे तसेच नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.