जळगावसह राज्यात गुलाबी थंडीची चाहूल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशभरात हिवाळा सुरु झाला असला तरी यंदा नोव्हेंबर महिन्याना संपला तरी थंडी जाणवत नव्हती.  मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून जळगावसह महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागू लागली आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले असून आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान , धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होत आहे.कोकण आणि राज्याच्या दक्षिण भाग वगळता उरलेल्या राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे.

राज्यात २१ नोव्हेंबर पासून थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निवळताच उत्तर भारतात पश्चिमी चक्रावत सक्रिय झाले आहे.या भागातून महाराष्ट्रात शीतलहरी येण्यास प्रारंभ झाला आहे.

 

राज्यातील तापमान

पुणे ३१.२, अहिल्यानगर ३१, धुळे ११, जळगाव ३२.८, कोल्हापूर ३०.३, महाबळेश्वर २४.५, नाशिक ३१.३, निफाड ३०.४, सांगली ३१.९, सातारा ३०.७, सोलापूर ३४.४, सांतक्रुझ ३५.८, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३५.८, छत्रपती संभाजी नगर ३१. ८.

 

Leave A Reply

Your email address will not be published.