Sunday, November 27, 2022

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

बऱ्याच दिवसांनंतर पावसाने राज्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. तर आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कोल्हापूर (Kolhapur), मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पालघर (Palghar) या परिसरात विजांच्या कडकडाटासह काल पाऊस झाला.  तर पुणे (Pune), नागपूर (Nagpur), कोकणातील (Konkan) सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) मुसळधार पाऊस झाला.

आज सकाळी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आजपासून पावसाचा जोर वाढणार असून दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

तसेच हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून (8 सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहणार. पालघर, ठाणे, धुळे, जळगाव, नंदूरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) सांगण्यात आला आहे. यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

गेल्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. काल (७ सप्टेंबर) राज्यातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. आजपासून तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या