राज्यात 4122 तलाठ्यांची भरती होणार !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात (Maharashtra) महसूल विभागामार्फत (Department of Revenue) 4122 तलाठी पदांची भरती (Talathi Bharti) लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली 1012 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 या पदांचा समावेश असून महसूल विभागाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय आयुक्तांकडुन जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सुचीत केले आहे.

महसुल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्यस्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणाऱ्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी मुंबईमध्ये (Mumbai) बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होते. त्यांच्या समस्या ऐकून राज्यातील रिक्त असलेल्या तलाठ्यांची भरती प्रक्रीया 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करून राबवण्याच्या सुचना मंत्री विखे-पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

राज्यातील महसुली विभागातील नाशिक विभागात (Nashik Division) 1035, औरंगाबाद विभागात (Aurangabad Division) 847, कोकण विभागात (Konkan Division) 731, नागपूर विभागात (Nagpur Division) 580, अमरावती विभागात (Amravati Division)183 तर पुणे विभागात (Pune Division) 746 अशा एकूण 4122 पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे.

तसेच मागासवर्गीय कक्षाकडुन बिंदु नामावली प्रमाणीत करुन त्यासंदर्भातील सामाजीक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशीलही जिल्हानिहाय मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता सुशीक्षीत तरुणांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.