Sunday, November 27, 2022

महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा केंद्राचा डाव- शिवसेना

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्यात सध्या सत्तासंघर्ष आहे. शिवसेनेच्या बंडानंतर राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच

महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा केंद्राचा डाव आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखात केला आहे. मुंबईला वेगळं करायचं हा भाजप नेत्यांचा आहे, पण भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच असा इशारा सामनातून देण्यात आला.

अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचा डाव

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची मोठी खतरनाक योजना भाजपमधील दिल्लीतील नेत्यांनी योजली आहे. महाराष्ट्राचे सरळ तीन तुकडे करायचे, मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा, असा हा डाव असल्याचे भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनीच उघड केले. यावर प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्यांचे काय सांगणे आहे ? जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करीत आहे, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची ऊर्जा निर्माण करीत आहेत अस शिवसेनेनं म्हंटल.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या