मोठी बातमी.. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.  नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती (Police Recruitment ) पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती.

राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

कुठे किती जागा आहेत?

मुंबई – 6740

ठाणे शहर – 521

पुणे शहर – 720

पिंपरी चिंचवड – 216

मिरा भाईंदर – 986

नागपूर शहर – 308

नवी मुंबई – 204

अमरावती शहर – 20

सोलापूर शहर- 98

लोहमार्ग मुंबई – 620

ठाणे ग्रामीण – 68

रायगड -272

पालघर – 211

सिंधूदुर्ग – 99

रत्नागिरी – 131

नाशिक ग्रामीण – 454

अहमदनगर – 129

धुळे – 42

कोल्हापूर – 24

पुणे ग्रामीण – 579

सातारा – 145

सोलापूर ग्रामीण – 26

औरंगाबाद ग्रामीण- 39

नांदेड – 155

परभणी – 75

हिंगोली – 21

नागपूर ग्रामीण – 132

भंडारा – 61

चंद्रपूर – 194

वर्धा – 90

गडचिरोली – 348

गोंदिया – 172

अमरावती ग्रामीण – 156

अकोला – 327

बुलढाणा – 51

यवतमाळ – 244

लोहमार्गपुणे- 124

लोहमार्ग औरंगाबाद -154

एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती – 1811

अनुसूचित जमाती – 1350

विमुक्त जाती (अ) – 426

भटक्या जमाती (ब) – 374

भटक्या जमाती (क) -473

भटक्या जमाती (ड) – 292

विमुक्त मागास प्रवर्ग – 292

इतर मागास वर्ग – 2926

इडब्लूएस – 1544

खुला – 5468 जागा

एकूण – 14956

 

Leave A Reply

Your email address will not be published.