Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»पोलीस भरती : १८ हजार जागांसाठी १८ लाख अर्ज
    महाराष्ट्र

    पोलीस भरती : १८ हजार जागांसाठी १८ लाख अर्ज

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात १८ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील पोलीस दलात चालक व शिपाई पदांवर भरती करण्यात येणार आहे. १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

    महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी १५ डिसेंबरपर्यंत १८ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी देण्यात आली आहे. पोलीस पदासाठी ६८ आणि पोलीस शिपाई या पदासाठी पाच तृतीयपंथी अर्ज आले आहे.

    परीक्षेचे वेळापत्रक उमेदवारांना २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.

    पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे.

    मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

    तसेच मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

     

    #maharashtra Maharashtra Police Recruitment Police Bharti Police Recruitment
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif