मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त आता दिनेश वाघमारे होणार असल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाचं बोललं जात आहे. दिनेश वाघमारे हे अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आता दिनेश वाघमारे होणार आहेत. ते अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. मंत्रीपरिषदेने निवडीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर दिनेश वाघमारे यांच्या शिफारस मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केलेल्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलं.