महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उत्तर महाराष्ट्र शाखेचा सुवर्ण वर्ष प्रारंभ  

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रिकल्चर उत्तर महाराष्ट्र नाशिक शाखेचा ५० व्या  वर्षात पदार्पण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतांना उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ हा नाशिक येथे शनिवार दि. 9 एप्रिल २०२२ रोजी सकाळी 9.30 वाजता कालिदास कलामंदिरात माननीय राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.

तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. दादासाहेब भुसे, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे तथा नाशिक जिल्ह्याचे सर्व आमदार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राच्या एकूण विकासामध्ये चेंबरच्या योगदानाचा लेखाजोखा मांडण्यात येणार असून उत्तर महाराष्ट्र विभागाच्या जडण घडणीत ज्या व्यक्ती तथा संस्थांच्या योगदानामुळे उत्तर महाराष्ट्र विभागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला अशा निवडक व्यक्तींचा वर्षभरात होणार्‍या विविध कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागातून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष पद भूषविलेल्या सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान ही करण्यात येणार असल्याचेही ललित गांधी यांनी सांगितले.

याप्रसंगी ”उत्तर महाराष्ट्र विकास परिषदेचे” आयोजन करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्र विभागाचा विविध क्षेत्रात जसे  उद्योग, व्यापार, कृषी, दळण वळण, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा इ. क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील संधी यासंबंधीचा एक अत्यंत अभ्यासपूर्ण रोड मॅप सादर केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमा अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागातील उद्योग, व्यापार, कृषी या क्षेत्रांसाठी  ”कौशल्य विकास परिषद” देखील आयोजित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी सर्व उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्रातील व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी तथा पदाधिकारी यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, नाशिक शाखा चेअरपर्सन सुनीता फाल्गुने, को-चेअरमन संजय सोनवणे, विजय वेदमुथा, आशिष नहार, उमेश वानखेडे, प्रदिप पेशकार, दत्ता भालेराव, नेहा खरे, संजय राठी, राजाराम सांगळे, ललित नहार, हेमंत गायकवाड, नितीन बंग, संगीता पाटील आदि,  तथा  उत्तर महाराष्ट्रातील विविध उद्योग व्यापार संघटनांचे पदाधिकारी काम करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.