गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज सकाळी मुंबईत राजभवनावर करण्यात आला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी 18 कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी आज झाला.

जळगाव जिल्ह्यातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन आणि माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरबार हॉलमधील व्यासपीठावर दाखल होते.

जळगाव जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाली असून गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख, तर गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे, आक्रमक आणि निष्ठावान शिवसैनिक समजले जातात.

18 आमदार होणार कॅबिनेट मंत्री 

राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील,  दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगल प्रभात लोढा या मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सर्व आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने पात्र कडून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी 18 आमदारांची नावे दिली असून ते कॅबिनेट मंत्री असल्याचे म्हटले आहे.

चित्रा वाघ यांचा राठोडांना घरचा आहेर 

पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देणे दुर्देवी असल्याचं भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.