मोठी बातमी.. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Maharashtra Cabinet Expansion) संपूर्ण जनतेचं लक्ष लागून. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी २२ जुलै रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडू शकतो. तसेच दोन टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात मोठ्या सत्तासंघर्षांनंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाने सरकार स्थापन केलं. या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तपहिल्या टप्प्यात ३० जणांचा समावेश असू शकतो. मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ जणांचा मंत्रिमंडळ असू शकते.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पहिल्या टप्प्यातील नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी अंतिम केली आहे. या नव्या मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी घेण्याची तयारीही सुरू झाली आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा समावेश असणार आहे. निश्चित केलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे दोन तृतीयांश मंत्री हे भाजपाच्या कोट्यातील असतील तर उरलेले शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार असतील. मंत्रिमंडळात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्याने संधी दिली जाईल.

यात कॅबिनेट मंत्रिपदी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jayakumar Rawal) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांचं नाव पहिल्या यादीत असू शकतं अशीही माहिती दिली आहे. तर ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या नऊ बंडखोर मंत्र्यांना मंत्रिमंडळात टप्प्याटप्प्याने स्थान मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.