राजभवनात शपथविधीची तयारी; कोणाची वर्णी लागणार ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा राजभवनात विस्तार होणार आहे. शपथविधी आज सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. यासाठी तयारी सुरु आहे. व्यासपीठावर 18 खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे 18 आमदार हे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे 9 व शिंदे गटातील 9 आमदार असतील. ज्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार आहे, त्या आमदारांना कालच पक्षश्रेष्ठींकडून फोन गेले.

अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळात संधी नाही?

राजभवनात शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. 18 आमदार हे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपाचे 9 आणि शिंदे गटातील 9 आमदार असतील, अशी जोरदार चर्चा आहे. अद्याप कोणत्याही अपक्ष आमदाराला मंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा झालेली नाही आहे किंवा कोणत्याही मोठ्या नेत्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. या मंत्रीमंडळात अपक्ष आमदारांना संधी देण्यात येणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलेय.

बच्चू कडूंना मंत्रीमंडळात स्थान नाही?

मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय हे सरकार राहू शकत नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार, येत्या काळात आपण गरीब, दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहणार, त्यामुळे आपल्याला मंत्रीपद भेटेल’, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मात्र आतापर्यंत बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा नसल्याने त्यांना या मंत्रीमंडळ विस्तारातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातून कोणाची वर्णी लागणार ?

1) उदय सामंत 2) दादा भुसे 3) संजय राठोड  4) संदीपान भुमरे 5) गुलाबराव पाटील 6) भरत गोगावले  7) शंभूराज देसाई 8) दीपक केसरकर 9) तानाजी सावंत

 

भाजपकडून कोणाची वर्णी लागणार ?

1) चंद्रकांत पाटील 2) राधाकृष्ण विखे पाटील 3) सुधीर मुनंगटीवार 4) गिरीश महाजन 5) सुरेश खाडे 6) अतुल सावे  7) मंगल प्रभात लोढा 8) रवींद्र चव्हाण  9) विजयकुमार गावित

 

Leave A Reply

Your email address will not be published.