Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»“महाराणी ताराराणी जैन धर्माच्या; औरंगजेबाला मारण्यासाठी…”
    अध्यात्म

    “महाराणी ताराराणी जैन धर्माच्या; औरंगजेबाला मारण्यासाठी…”

    जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 1, 2026Updated:April 1, 2026No Comments259 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाशी लढा देणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी वादग्रस्त विधान केलंय. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं विधान जैन मुनींनी केलंय. मुंबईत जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, भारतावर मोहम्मद घोरीनं आक्रमन केलं तेव्हा जैन असणाऱ्या मेवाडच्या राणीनं तलवार काढली. त्यानंतर अनेक वर्षे आपल्या देशाकडे नजर वर करून बघण्याची हिंमत कुणी केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेण्याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यानं भारताला पूर्ण स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेबानं संभाजीराजेंना पकडून हाल केलं. तेव्हा आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती महाराणी म्हणजे ताराराराणी.

    मोदींवर कौतुकाचा वर्षाव
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. त्यांनी म्हटलं की, धर्माला विसरणाऱ्या समाजाला भविष्य नसते. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला. त्याआधी स्वातंत्र्य मिळालं पण गुलाम बहरत होता. पंतप्रधान मोदींनी राम मंदिरं बांधून हिंदूंना मोठी भेट दिली. वयाच्या ५७ व्या वर्षीही मोदीजी काम करतायत आणि तुम्ही ते करू शकत नाही.

    जैन धर्म कोणत्याही जातीत भेद मानत नाही. संविधान अखंड भारत बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणत्याही धर्माला संविधानातून वगळलं नाहीय. पण जो धर्म लोकांना मारायला शिकवतो त्यावर बंदी घातली पाहिजे. कोणत्याही गल्लीत जा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ऐकू येतील. आमचा धर्म कुठलाही असला तरी भारतात राहणारा प्रत्येक हिंदू असल्याचंही जैन मुनी नयन पद्मसागर म्हणाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वास्तु सुगंधालयाचे दिमाखदार उद्घाटन

    October 23, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    ‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

    September 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif