Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»आरोग्य»खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भरपाई समिती स्थापन; ७ दिवसांत होणार सुनावणी, ८ आठवड्यांत निर्णय
    आरोग्य

    खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भरपाई समिती स्थापन; ७ दिवसांत होणार सुनावणी, ८ आठवड्यांत निर्णय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 4, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांसाठी भरपाई समिती स्थापन; ७ दिवसांत होणार सुनावणी, ८ आठवड्यांत निर्णय

    जळगाव प्रतिनिधी ;- रस्त्यांवरील खड्डे आणि उघडे मॅनहोल्स (चेंबर्स) यांमुळे वाढणाऱ्या अपघातांना आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यू- दुखापतींना आळा घालण्यासाठी भरपाई समित्या स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, त्या अनुषंगाने जळगाव महानगरपालिकेत देखील विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत महापालिका आयुक्त आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांचा समावेश आहे.

    शहरातील अनेक रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने नव्याने तयार झालेले रस्ते अल्पावधीतच खड्डेमय होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईनचे झाकण नसल्यानं वाहनधारकांच्या नजरेस वेळेवर धोका दिसत नाही आणि त्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने संबंधित सर्व स्थानिक प्राधिकरणांना भरपाई समित्या गठीत करण्याचे निर्देश दिले.

    या समित्या अपघातग्रस्त व्यक्तींना किंवा मृतांच्या वारसांना भरपाई देण्याबाबत निर्णय घेणार आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, भरपाईसाठी अर्ज प्राप्त झाल्यावर सात दिवसांच्या आत समितीची बैठक घेण्यात यावी, घटनेची पडताळणी करून सहा ते आठ आठवड्यांच्या आत भरपाईबाबत निर्णय देण्यात यावा. या आदेशामुळे नागरिकांना न्याय मिळविण्याचा वेगवान मार्ग उपलब्ध झाला असून, रस्त्यांच्या देखभालीसाठी जबाबदार यंत्रणांवर उत्तरदायित्वाची जबाबदारी आणखी वाढली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif