जळगाव : वाढते प्रदूषण, धावपळीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे हृदयविकाराच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. हे लक्षात घेता, जळगाव येथील महादेव हॉस्पिटल मधील ‘सुपर स्पेशालिटी’ विभागांतर्गत हृदयरोग रुग्णांसाठी विशेष सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच आवश्यक रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व महत्त्वाच्या चाचण्यांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध सुविधांचा समावेश आहे. यात विशेष हृदयरोग तज्ज्ञांकडून तपासणी होते. हृदय तपासणी चाचण्यामध्ये ईसीजी, २डी इको आणि टीएमटी यांसारख्या अत्याधुनिक चाचण्या केल्या जातात.
सीबीसी, रँडम बीएसएल, लिपिड प्रोफाईल आणि एचबीए 1 सी यासह किडनी फंक्शन टेस्ट सारख्या आवश्यक तपासण्याही येथे उपलब्ध आहेत. हृदयविकाराची लक्षणे जाणवताच त्वरित निदान होणे गरजेचे असते. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या अद्ययावत मशिनरी आणि अनुभवी डॉक्टरांमुळे अचूक निदानासाठी मोठी मदत होत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे तपासणीसाठी यावे असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी (9325150004, 9588476596) या क्रमांकावर संपर्क करावा.