महाड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा

0

महाड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा

मतदान यंत्रातील बिघाडामुळे तणाव; वाहनांची तोडफोड, पोलिसांचा हस्तक्षेप

अलिबाग वृत्तसंस्था नगरपालिका निवडणुकीदरम्यान महाड शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तीव्र वादातून हाणामारी झाली असून काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. अचानक पेटलेल्या राजकीय संघर्षामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महायुतीत समाविष्ट असूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद वाढत होते. प्रचारादरम्यान आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू होतीच. याच वादाचा कळस मंगळवारी महाड नगरपालिका निवडणुकीत दिसून आला.

प्रभाग क्रमांक २ मधील मतदान केंद्रात सकाळच्या सत्रात मतदान यंत्र सातत्याने बंद पडत असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. यंत्राच्या बिघाडामुळे केंद्रावर मोठी गर्दी झाली. या गोंधळातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि परस्परांमध्ये शिवीगाळ तसेच ढकलाढकली सुरू झाली.

घटनास्थळी तणाव वाढताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना मतदान केंद्राबाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.