Friday, December 9, 2022

महा ई-सेवा केंद्रातून आर्थिक लूट…

- Advertisement -

 

- Advertisement -

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

यावल शहरातील व ग्रामीण भागात असलेल्या महा ई-सेवा केंद्रातून दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले शासकीय फी च्या रकमेपेक्षा जास्त फी घेऊन दिले जात असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून होत आहे.

- Advertisement -

महा ई-सेवा केंद्रातून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास दाखला, नाँनक्रिमल आदी विविध प्रकारचे दाखले तसेच शासकीय योजनासह ४२ प्रकारचे दाखले वितरीत करण्यात येतात. विद्यार्थी व पालकांकडुन महा ई-सेवा केंद्र चालकांकडुन कोणतेही टोकण पावती न देता, आवश्यक असलेले कागदपत्रे मुदतीच्या कालावधीत न देता आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे तक्रारी ग्रामीण भागातून होत आहे.

शासनाने आवश्यक असलेल्या विविध प्रकारचा दाखला व त्या करीता लागणाऱ्या कालावधी असा प्रकारचे फलक प्रत्येक सुविधा केंद्राच्या दर्शनी भागात लावलेले असून, त्याची अंबलबजाणी केली जात नाही.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या