महागाईचा भडका ! मॅगीसह ‘या’ वस्तूंच्या किंमतीत वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यात आणखी भर पडली आहे. मॅगी, चहा, कॉफी, दूध आणि नूडल्सच्या किंमती वाढल्या आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले या दोन्ही कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. आजपासून (14 मार्च) चहा, कॉफी, दूध आणि नूडल्सच्या किमती वाढल्या आहेत. एचयूएलने म्हटले की, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.

ब्रू कॉफीचे दर

हिंदुस्तान युनिलिव्हरने ब्रू कॉफीच्या किमतीत 3-7% आणि ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीत 3-4% ने वाढ केली आहे. इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीदेखील 3% वरून 6.66% पर्यंत वाढल्या आहेत.

ताजमहाल चहाचे दर

तसेच ताजमहाल चहाची किंमत 3.7% वरून 5.8% पर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रुक बाँडच्या सर्व प्रकारच्या चहाच्या किमतीत 1.5% वरून 14% पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मॅगीचे दर

नेस्ले इंडियानेही मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाढलेल्या किंमतीनंतर मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पॅकसाठी आता 12 रुपयांऐवजी 14 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच 140 ग्रॅम मॅगी मसाला नूडल्ससाठी 3 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. यापूर्वी 560 ग्रॅम मॅगीच्या पॅकसाठी 96 रुपये मोजावे लागत होते, मात्र आता यासाठी 105 रुपये मोजावे लागणार आहेत.

नेस्लेचे हे उत्पादन महागले

याशिवाय कंपनीने दूध आणि कॉफी पावडरच्या दरातही वाढ केली आहे नेस्लेने एक लिटर A+ दुधाच्या दरातही वाढ केली आहे. यापूर्वी 75 रुपये द्यावे लागत होते, तर आता 78 रुपये मोजावे लागणार आहेत. नेसकॅफे क्लासिक कॉफी पावडरच्या किमती 3-7% वाढल्या आहेत. त्याच वेळी, नेसकॅफेचे 25 ग्रॅमचे पॅक आता 2.5% महाग झाले आहे. यासाठी 78 रुपयांऐवजी आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच 145 रुपयांऐवजी 50 ग्रॅम नेसकॅफे क्लासिकसाठी ग्राहकांना 150 रुपये मोजावे लागणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.