माधुरी दीक्षितवर कोसळला दुःखाचा डोंगर, ह्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेट्वर्क

माधुरी दीक्षितवर (Madhuri Dixit) आज आभाळ कोसळला आहे. तिची आई स्नेहलता तिची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वरळीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. माधुरीच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती रिक्कू राकेश यांनी याबद्दलची माहिती दिली. स्नेहलता यांनी त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर माधुरीनेही अंत्यसंस्काराबाबतचा संदेश दिला आहे. ‘माझी प्रेमळ आई स्नेहलता दीक्षितचं आज सकाळी निधन झालं. मुंबईतील वरळी इथल्या स्मशानभूमीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, असं तिने लिहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.