मूळजी जेठा महाविद्यालात छात्र सैनिकांनी केले रक्तदान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालातील एनसीसी आणि एनएसएस युनिट द्वारे ऐन उन्हाळ्यात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजात माणुसकीचे दर्शन घडविले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी यांच्या आवाहनावरून छात्र सैनिक आणि स्वयंसेवकानी आज मानव शाखेच्या इमारतीत एक दिवसीय रक्तदान शिबीर पार पडले.

सामाजिक प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे आणि कला शाखेचे प्रमुख प्रा. (डॉ.) बी.एन. केसुर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. तसेच वाहतूक शाखेचे पी.आय. कानडे यांनी देखील या शिबिरास उपस्थिती देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले.

या शिबिराचे आयोजन एन.सी.सी अधिकरी लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांच्या नेतृत्वात झाले. एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. आर. वसावे, प्रा. गोविंद पवार यांचे त्यांना सहयोग लाभले. जिल्हा रुग्णालय रक्त पतपेढीचे डॉ. दीपक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचे यात मोलाचे योगदान होते. प्राचार्य प्रा. डॉ. एस.एन. भारंबे यांनी देखील शिबिरातील रक्तदात्यांचे कौतुक केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.