ठाण्यात दारू आणि पैशाचे आमिष

ठाकरे गटाच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाण्यामध्ये विदेशी दारू आणि पैशांची पाकीटं वाटप करताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला त्यांच्या साथीदारांसह पोलिसांनी अटक केली असून. पोलिसांनी विदेशी दारू आणि पैसे जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यात कोपरी पाचपाखडी मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कोपरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात अदखलपात्र गुन्हा क्रमांक १८४२/२०२४, भारतीय न्यायसंहिता कलम १७४ प्रमाणे नोंदवला आहे.

याप्रकरणी वर्षा शरद भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदिप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू आणि पांडुरंग दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारू, पैशांची पाकिटे आणि कार जप्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.