Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»लकी डे! विजयचा ‘विजय’ अन् त्रिशाचा ‘वाढदिवस’!
    राजकारण

    लकी डे! विजयचा ‘विजय’ अन् त्रिशाचा ‘वाढदिवस’!

    निकालानंतर त्रिशा कृष्णन थेट विजयच्या घरी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments46 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. जे कोणाला वाटलं नव्हतं असं घडलं. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजयच्या पक्षाने बाजी मारली आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील TVK मोठा पक्ष ठरला आहे. थलपती विजयचा TVK पक्ष 105 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मतदानानंतर सर्व एक्झिट पोल्सनी द्रमुकच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. पण तसं घडलं नाही. द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांना विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे.

    TVK च्या एवढ्या मोठ्या विजयाचा हिरो आहे पक्षाचा संस्थापक थलपती विजय. या थलपती विजयच्या राजकीय करिअरबरोबर त्याच्या व्यक्तीगत आयुष्याची सुद्धा बरीच चर्चा झाली. 27 वर्षाच्या विवाहानंतर त्याने पत्नीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत विवाहबाह्य प्रेमप्रकरण चर्चेचा विषय बनलं. TVK च्या यशानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केलय. पुढचा मुख्यमंत्री विजयच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. पण थलपती विजयची प्रतिक्रिया अजून आलेली नाही. तो कुठे आहे? अशी चर्चा त्याच्या समर्थकांमध्ये सुरु आहे. कदाचित पूर्ण निकाल लागल्यानंतरच तो काही बोलू शकतो.

    एक अजब योगायोग

    आज विजय आणि तृषा कृष्णनच्या आयुष्यात एक अजब योगायोग जुळून आला. आज विजयने राजकारणात मोठं यश मिळवलं आहे तेच आज तृषाचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोघांसाठी हा दिवस खूप खास आहे. विजय अजून समर्थकांसमोर आलेला नाही. पण तृषा कृष्णने विजयच्या निवासस्थानी पोहोचली आहे. तिरुमाला येथे दर्शन घेऊन आल्यानंतर तृषा कृष्णनची कार विजयच्या घरात जाताना दिसली. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    तामिळनाडूत पुन्हा ट्विस्ट : अण्णाद्रमुक पक्षात फुट!

    May 12, 2026

    लाडकी बहीण योजनेने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif