नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने भेट दिली असून महागाईच्या काळात थोडा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 19 किलो LPG सिलिंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत. सरकारी तेल कंपनीने या गॅस सिलिंडरच्या दरात थोडीशी घट केली आहे. नवीन किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू झाल्या आहेत.
किमतीत काहीशी घट
मात्र स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या 14.2 किलो LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय आजपासून विमानांमध्ये वापरल्या जाणार्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ इंधन) च्या किमतीतही बदल करण्यात आला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत काहीशी घट झाली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1755.50 रुपये झाली आहे. आधी 1757 रुपयांना मिळत होता.
घरगुती सिलिंडरच्या किमती
14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 30 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्या किमती शेवटचा बदलण्यात आल्या होत्या. दिल्लीत हा एलपीजी सिलिंडर 903 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकातामध्ये 929 रुपये, मुंबईत 902 रुपये आणि चेन्नईमध्ये 918 रुपयांना उपलब्ध आहे.