Wednesday, August 17, 2022

सिलेंडरचा भीषण स्फोट ; संसारउपयोगी वस्तू, पैसै, शेळ्या खाक

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

नाशिक: येथील नांदगाव तालुक्यातील आमोदे येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू, घरात असलेली पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम यासह दोन शेळ्या भाजल्याने जागीच ठार झाल्या. या स्फोटात एक दुचाकी देखील जळाली आहे.महसूलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी झालेला घटनेचा पंचनामा करत झालेल्या नुकसानीची नोंद केली आहे

- Advertisement -

- Advertisement -

गावाच्या बाहेर राहणारे सोमनाथ महादु पाटील (वय ३० ) यांच्या घरात (दि. २१) सिलेंडरचा स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तू सह रोख रक्कम व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत महसूल विभागाला या घटनेची माहिती दिली असता,

महसूलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी झालेला घटनेचा पंचनामा करत झालेल्या नुकसानीची नोंद केली , यात रोख रक्कम ५० हजार रुपये, संसार उपयोगी वस्तू तसेच मोटर सायकल जळून खाक झाली. भाजल्याने दोन शेळ्या जागीच मृत्यूमुखी पडल्या.

सोमनाथ पाटील व त्यांची पत्नी हे मुलांना घेऊन मजुरी साठी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेले होते. त्या वेळात घरी कोणीच नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली, सदर घटनेची माहिती मिलिंद सोनवणे, तलाठी रामदास आवचार तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहित झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या