चीनच्या घुसखोरीवरून लोकसभेत जोरदार गदारोळ

राहुल गांधींचे संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी माजी लष्करप्रमुखांचे अप्रकाशित पुस्तकाचा दाखल देत लद्दाखमध्ये चीनच्या सैन्यांनी घुसखोरी केल्याचा दावा करत राहुल गांधींनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावरून लोकसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांनी सभागृहात हा मुद्दा वारंवार उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापतींनी नियमांचा हवाला देत त्यांना तसे करण्यापासून रोखले.

सभागृहात सरकारच्या वतीने असे सांगण्यात आलं की. राहुल गांधी ज्या पुस्तकाच्या आधारे आरोप करत आहेत ते पुस्तक प्रकाशितही झालेले नाहीये. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींनी दिलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. एका अप्रकाशित पुस्तकामधील उल्लेखांचा हवाला देत राहुल गांधी यांनी भारताच्या भूमीवर चिनी टँक घुसले होते, असा आरोप केला. राहुल गांधी यांनी केलेल्या या दाव्यांना सत्ताधारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी या दाव्यांवर आक्षेप घेत आरोप फेटाळून लावले.

दरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांनी संदर्भासाठी वापरलेलं पुस्तकही चर्चेत आलं आहे. तसेच हे पुस्तक कोणतं, अशी विचारणा होतेय. लोकसभेमध्ये केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागताना राहुल गांधी यांनी ज्या अप्रकाशित पुस्तकामधील मजकुराचा संदर्भ दिला, ते पुस्तक माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलंय. या पुस्तकाचं नाव फोर स्टार्ट ऑफ डेस्टिनी असं आहे. या पुस्तकामध्ये अनेक घडामोडींचा उल्लेख करण्यात आलाय. तसेच २०२० साली चीनसोबत लडाख आणि गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाचाही त्यात उल्लेख आहे.

मात्र हे पुस्तक अद्याप प्रदर्शित झालेलं नाही. संरक्षण मंत्रालयाकडून या पुस्तकाचं परीक्षण करण्यात येत आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यापुर्वी अवलंबण्यात येणारी ही नियमित प्रक्रिया आहे.अशा पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी त्याचं संरक्षण मंत्रालयाकडून परीक्षण आणि मान्यता आवश्यक असतं.

Leave A Reply

Your email address will not be published.