Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले : तामिळनाडू, केरळात सत्ताबदल!
    संपादकीय

    पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलले : तामिळनाडू, केरळात सत्ताबदल!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 4, 2026No Comments171 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    पाच राज्यांचे निकाल घोषित झाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपने बाजी मारली. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे फक्त दोन आमदार निवडून आले होते. 2021 च्या निवडणुकीत भाजपने जंग जंग पछाडले असता फक्त 77 जागांवर समाधान मानावे लागले होते. 2026 च्या यंदाच्या निवडणुकीत भाजपने 200 च्या पार जागा जिंकून स्पष्ट बघून प्राप्त केले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भावनिपूर मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. निवडणुकीनंतर मतदान केंद्रावर मतदारांचा राडा सुरू झाला असून अनेक मतदारसंघांमुळे पुनर्मतमोजणीची मागणी केली. काही झाले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या दिल्ली कार्यालयातून देशाला संबोधित केले आहे. दुसरीकडे तामिळनाडू राज्यात डीएमकेच्या स्टॅलिन यांना मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन हे पराभूत झाले आहेत. पण अवघ्या 55 जागा त्यांना मिळाल्या असून तीन नंबरवर त्यांचा पक्ष आहे. तामिळनाडूचे अभिनेते विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा मिळाल्या असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या वडिलांनी काँग्रेसला हात मिळवणी करण्याची ऑफर दिली असून सत्ता स्थापनेसाठी साद घातली आहे. एआयडीएमकेला एकूण 77 जागा मिळाल्या आहेत. तिकडे आसाम मध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक साधली असून त्यांना विश्वास यांच्या नेतृत्वात एकूण 84 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला एकूण 20 जागा मिळाल्या आहेत. केरळमध्ये यावेळी सत्तांतर झाले असून डाव्यांना फक्त 34 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने 104 जागा जिंकून सत्ता स्थापनेचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा प्रकारे एकूण चार राज्यांच्या महत्त्वाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने बाजी मारून बहुमत प्राप्त केले आहे. पश्चिम बंगाल मध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम बंगालचे एक्झिट पोलचे निकाल देखील भाजपच्या बाजूने लागून एकदम खरे ठरले आहेत, तर तामिळनाडू आणि केरळमध्ये एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. तामिळनाडू मध्ये स्टॅलिनच्या डीएमके पक्षाला धक्का बसला आहे. तेथे मुख्यमंत्री स्टॅलिन हे पराभूत झाले आहेत, तर केरळमध्ये डाव्यांना यावेळी फक्त 34 जागा मिळाल्या आहेत. 104 जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली आहे. आसाम राज्याच्या बाबत एक्झिट पोल खरे ठरले आहे. तेथे भाजप पुन्हा विजयी झाले आहे. या ठिकाणी काँग्रेसला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत आणि त्या पक्षाचे तरुण गोइल हे पराभूत झाले आहेत हे विशेष होय. आता निकालानंतर विशेषतः पश्चिम बंगालच्या निकालानंतर भाजप विरोधात जोरदार टिकीची झोड उठली आहे. 92 लाख मतदार बंगालच्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याने टीका होते आहे. नेहमीप्रमाणे ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी बाबत टीका होते आहे. काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचाराचा झंजावात कामी आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे भवानीपुर मतदार संघातून दोन हजार मतांनी पराभूत झाल्यामुळे येथे रीकाउंटिंगची मागणी केली आहे आणि राज्यपाल यांनाही त्या भेटणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की भवानीपुर मतदार संघात मतमोजणी मध्ये हेराफेरी झाली आहे. त्यासाठी फेर मतमोजणी करण्याची त्यांची मागणी आहे. काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे. पण बहुतेक मतदारसंघात राडा निर्माण झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif