बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शोभायात्रा : चित्तथरारक कलाप्रकाराचे सादरीकरण
जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने रविवार, दि. 19 एप्रिल रोजी, जळगाव शहरात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच समाजातील इतर संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमही पार पडले.
राज्य शासनाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (राज्यमंत्री पदाचा दर्जा), ब्राह्मण संघर्ष समिती मुख्य समन्वयक अर्चना सरूडकर, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन पारगावकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी सायंकाळी सुभाष चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भगवान श्री परशुराम रथासह अजेय अपराजित योद्धा बाजीराव पेशवा ढोल पथक व राणी लक्ष्मीबाई लेझीम पथक, माता रेणुका दांडीया पथक सहभागी झाले होते. समारोप शिवतीर्थावर झाला. दादा महाराज जोशी यांचे आशिर्वचन झाले. आकाश त्रिवेदी (आयएएस), घनपाठी देवेंद्र गढीकर, स्वीकृत सदस्य सुभाष शौचे आणि कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शोभायात्रेत महिलांकडून तलवारबाजी व दांडपट्टा चालविण्याची प्रात्यक्षिके सादर केली.

ओंकार स्वर संपदातर्फे परशुराम गीत गायनाने अक्षय तृतीया सूरमयी
ओंकार स्वर संपदाच्या वतीने महाबळ कॉलनी परिसरातील समर्थ रामदास स्वामी मंदिरात परशुराम गीतगंगा गायनाने अक्षय्य तृतीयेची पूर्वसंध्या सूरमयी झाली. या कार्यक्रमात डॉ. मुकुंद पुल्लिवार (नागपूर) यांनी भगवान परशुराम यांच्या जीवनावर रचलेल्या 15 कविता गीतांचे सादरीकरण झाले. या गीतांना गायक व संगीतकार दुष्यंत जोशी यांनी सुरेल चाली लावल्या. यावेळी संपदा छापेकर, श्रावणी भालेराव, रेणुका जोशी, डॉ. विशाखा जोशी, दिलीप चौधरी यांनी गीते सादर केली. तबल्यावर राहुल कासार यांनी साथ दिली, तर निरूपण वीरेंद्र मोदे यांनी केले. सुरुवातीला प्रभू श्रीराम व भगवान परशुराम यांच्या प्रतिमांचे पूजन मंदिर व्यवस्थापक संजय दीक्षित, प्रा. शरच्चंद्र छापेकर, डॉ. सुभाष महाले यांनी केले. आभार संपदा छापेकर मानले. परशुरामाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्रह्मश्री परिवारातर्फे रविवार, दि. 19 एप्रिलला सकाळी प्रेमनगर भागातील सप्तश्रृंगी देवी मंदिरात भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विनायक बिडकर, आशा बिडकर, अर्चना सरूडकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य दीपक कुळकर्णी व प्रसाद पटवे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी अशोक कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, अशोक वाघ, कमलाकर फडणीस, डॉ. नीलेश राव, महेंद्र जोशी, स्मिता चौधरी, दीपक महाजन, प्रशांत कुलकर्णी, सुनील कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ब्राह्मण सभेतर्फे प्रतिमा पूजन
ब्राह्मण सभेत संस्थेचे उपाध्यक्ष अमोल जोशी यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. धार्मिक समिती प्रमुख मुकुंद धर्माधिकारी यांनी शस्त्र आणि ज्ञान दोन्हींमध्ये निपुण असणाऱ्या भगवान परशुराम यांच्याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी कोषाध्यक्ष संदीप कुलकर्णी, चिटणीस संजय जोशी, खांबेटे व्यायाम शाळा चिटणीस जितेंद्र याज्ञिक, समिती सदस्य कमलाकर फडणीस, हेमंत वैद्य, व्यवस्थापक सचिन कुळकर्णी व कर्मचारी अभिमान तायडे उपस्थित होते.


