लोकशाही समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त “संभाजी राजे छत्रपती” जळगावात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव – येथील गणमान्य दैनिक लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आज रविवारी संध्याकाळी सहा वाजता ”शिवकुल संवाद” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी “छत्रपती शिवाजी महाराजांचे” तेरावे वे वंशज कोल्हापूर संस्थानाचे “ मा. श्री. संभाजी राजे छत्रपती” जळगाव नगरीत येत आहेत.

 

शिवाजी पुतळ्यास माल्यारपण

संभाजी राजे छत्रपती यांचे जळगाव नगरीत आगमन झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी शिवतीर्थ (जि.एस ग्राउंड) मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करतील, त्यांनतर संभाजी राजे छत्रपती बाईक रॅली द्वारे महाबळ येथील संभाजी राजे नाट्यगृह येथे कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचतील.

देवदुर्लभ स्वागत

सायंकाळी ६ वाजता महाबळ येथील संभाजी राजे नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संभाजी राजे छत्रपती यांचे मोठ्या दिमाखात राजेशाही थाटात भव्य दिव्य असे स्वागत करण्यात येणार आहे. हा नयनरम्य सोहळा जळगावकरांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा असणार आहे. या प्रसंगी जळगाव येथील प्रतिष्ठित नामवंत  मान्यवर उपस्थित असणार आहे.

शिवकुल संवाद

लोकशाहीच्या वर्धापन दिना निमित्त शिवकुल संवाद देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक एस जयकुमार, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश दामू भोळे(राजूमामा), आ. मंगेश चव्हाण, आ. किशोर पाटील, आ. लताबाई चंद्रकांत सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. संजय सावकारे, आ. अनिल भाईदास पाटील, आ. चिमणराव रूपचंद पाटील (चिमणआबा), आ. चंद्रकांत पाटील, महापौर सौ. जयश्री महाजन, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, उपमहापौर. कुलभूषण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद पंकज आशिया, मा. मंत्री एकनाथराव खडसे, भरत अमळकर, कुलगुरू व्ही एल माहेश्वरी, मंगेश महाराज, उज्वल निकम, भागवत भंगाळे, मा. पप्पू शेठ बाफना, अनिल कांकरिया आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

शिवकुल संवाद कार्यक्रमांतर्गत शंभू पाटील संभाजी राजे छत्रपती यांची प्रकट मुलाखत घेणार आहे. हा सोहळा सर्वांसाठी खुला आहे.

या सोहळ्यास लोकशाहीच्या वाचकांनी, जाहिरातदारांनी, हितचिंतकांनी, मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.