Friday, August 12, 2022

“लोकशाही दिन” जिल्हाधिकारी कार्यालयात होणार ऑनलाइन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन होत असून 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी आपला अर्ज वैयक्तिक स्वरुपाचेच अर्ज [email protected] या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावेत सार्वजनिक स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास ते प्रशासकीय अर्ज म्हणून ग्राहय धरण्यात येऊन लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत.

तसेच अर्जामध्ये व्हॉट्सअॅप नंबर नमुद करावे जेणेकरुन सदर लोकशाहीच दिनाची लिंक आणि पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या