२ डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाहीदिन सोमवार दिनांक  २ डिसेंबर, 202४ रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी दिली आहे.

या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.

नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.