कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी राज केव्हा संपणार?

0

प्रभारी राज

1) कुलगुरू – डॉ.ई. वायुनंदन

2) प्रो. कुलगुरू – डॉ. बी.बी. पवार,

3) कुलसचिव – आर.एल. शिंदे

परीक्षा नियंत्रक – दीपक दलाल

5) वित्त लेखाधिकारी – एस.आर. गोहील

आतापर्यंतचे कुलगुरू

1) डॉ.एन.के. ठाकरे – 3+3 = 6 वर्षे

2) डॉ.एस.एफ. पाटील – 5 वर्षे

3) डॉ. माळी – 5 वर्ष

4) डॉ.के.बी. पाटील – 5 वर्ष

5) डॉ. सुधीर मेश्राम – 5 वर्ष

6) डॉ.पी.पी. पाटील – 4 वर्षे (राजीनामा)

जळगाव, धुळे, आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी 32 वर्षेापूर्वी स्थापन झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या एक वर्षापासून कुलगुरूपासून ते कुलसचिव, प्रो. कुलगुरू परीक्षा नियंत्रक, वित्त लेखाधिकारी ही विद्यापीठाचा आत्मा असलेली पदे एक वर्षापासून रिकामी असून या सर्व पदांवर सध्या प्रभारी अधिकारी कामकाज पहात आहेत. हे प्रभारी राज संपेल केव्हा? आणि या सर्व पदांवर कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल केव्हा? याची प्रतिक्षा आहे.

महाराष्ट्राचे आणि विद्यापीठाचे कुलपती महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा सोमवार दि. 28 फेबु्रवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यीपीठात कार्यक्रम आहे. राज्यपाल कोशारी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट देत असल्याने त्यांचेसमोर व सदर विद्यापीठा संदर्भातील व्यथा मांडणे आवश्‍यक आहे. एक वर्षापूर्वी विद्यीपीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी. पाटील यांनी आपल्या कुलगुरूपदाची मुदत संपण्याआधी एक वर्ष आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. पी.पी.पाटील यांनी मुदतीआधीच विद्यापीठातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे.

डॉ.पी.पी. पाटील हे विद्यापीठातील राजकारणाचे बळी ठरले आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात चालणारे राजकारण संपुष्ठात येईल याची दखल महामहिम राज्यपाल कोशारी यांनी घेतली तर महाराष्ट्रात अवघ्या 32 वर्षात नावारूपाला आलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नावलौकिकास गालबोट लागेल.

कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील हे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच राजकारण विरहित म्हणून त्यांनी चार वर्षे विद्यापीठात चांगली कामगिरी बजावली. तथापि अचानक त्यांना कुलगुरू म्हणून काम करणे असह्य झाले.

शेवटी या राजकारणाला कंटाळून एक वर्षापूर्वी म्हणजे 8 मार्च 2021 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांचेकडे सुपूर्द केली. तेव्हापासून ते आजतागायत डॉ.ई. वायुनंदन हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यीपाठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून काम पहात आहेत. म्हणजे नाशिकच्या यशतवंतराव चव्हाण मुक्त विद्यीपाठाचे पूर्णवेळ कुलगुरूपद सांभाळून उत्तर महाराष्ट्र विद्यीपाठाचे कामकाज पहात आहेत. त्याचा परिणाम एकत्र नाशिक येथे बसून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कामकाज ऑनलाईन पहातात. तसेच एखादवेळी महत्वाचे असेल तर प्रत्यक्ष जळगावला येऊन कामकाज पहातात.

गेले वर्षभर हे प्रभारी काम चालू आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कुलगुरू असणे आणि प्रभारी पद सांभाळणे यात गुणवत्तेच्या दृष्टीने अथवा विद्यीपीठाच्या कामकाजाचे दृष्टीने फरक तर पडणारच. त्यासाठी विद्यीपाठीच्या कायमस्वरूपी कुलगुरूपदाची निवड लवकरात लवकर व्हावी हीच या निमित्ताने आपल्याला विनंती. सध्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया चालू आहे. असे कळले. परंतु ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही विनंती.

कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांनी एक वर्षापूर्वी राजीनामा दिल्यामुळे प्रो. कुलुगरू डॉ. माहुलीकर यांनी सुध्दा राजीनामा दिला आहे. प्रो. कुलगुरू माहुलीकर यांचे जागी कॉम्प्युटर सायन्सचे हेड प्रा. डॉ.बी.व्ही. पवार हे सध्या प्रभारी प्रो. कुलगुरू म्हणून काम पहात आहेत. नवीन कुलगुरूंची निवड झाल्यानंतर प्रो. कुलुगरूपदी कायमस्वरूपी दुसऱ्याची निवड होऊ शकते.

विद्यापीठाचे कुलसचिव हे दैनंदिन प्रशासकीय कामासंदर्भातील अत्यंत महत्वाचे पद आहे. तथापि हे कुलसचिवपद सुध्दा गेल्या सहा महिन्यांपासून रिकामे असून तेथे प्रभारी म्हणून स्टॅटिस्टीक डिपाटॅमेंटचे रामकृष्ण लहू शिंदे हे काम पहात आहेत. कुलसचिव म्हणून असलेले एस.आर. भादलीकर यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कुलसचिवपदी नियुक्ती झाली आहे.

परीक्षा नियंत्रक हे पद सुध्दा विद्यापीठात अनन्य साधारण महत्वाचे व गोपनीय असे पद आहे. परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रा. के. एल. पवार हे प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पहात होते. तथापि त्यांनी सुध्दा राजीनामा दिल्यानंतर दिपक दलाल हे प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पहात आहेत.

विद्यापीठाचे आणखी एक महत्वाचे पद वित्त लेखाधिकारी हे पदसुध्दा गेल्या सहा महिन्यांपासून रिकामे आहे. वित्त लेखाधिकारी डॉ.बी.डी. कराड यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचे जागी प्रभारी म्हणून सोमनाथ रणछोडदास गोवील हे काम पहात आहेत. एकंदरीत विद्यीपीठाची महत्वाच्या पदावर असलेले किंबहुना विद्यीपाठाचा आत्मा असलेली सर्व पदे रिकामी असून त्या पदावर प्रभारी म्हणून इतर काम पहात आहेत. ही पदे कायमस्वरूपी भरून कयवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यीपाठातील प्रभारी राज संपले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. आणि ती मागणी रास्त आहे. त्यासाठी कसलेही राजकारण न आणता कुलगुरू पासून ते इतर सर्व पदे कायमस्वरूपी भरावीत. अन्यथा विद्यीपीठाचा शैक्षणिक दर्जा घसरल्याशिवाय राहणार नाही.

15 ऑगस्ट 1990 रोजी स्थापन झालेल्या या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आतापर्यंतच्या सर्व कुलगुरूंनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यात संस्थापक कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांना 3-3 वर्षे असा सहा वर्षाचा कालावधी मिळाला. त्यांनी तो यशस्वीपणे पूर्ण तर केलाच शिवाय विद्यापीठाची उत्तमरित्या पाया भरणी केली. त्यानंतर डॉ.एस. एफ. पाटील, पाच वर्षे, डॉ. माळी पाच वर्षे, डॉ. के.बी.पाटील पाच वर्षे, डॉ. सुधीर मेश्राम पाच वर्ष असा कालावधी पूर्ण केला. फक्त सहावे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनीच एक वर्षाआधीच आपला राजीनामा दिला. त्यांचीही चौकशी व्हावी. महामहीम राज्यपाल कोशियारी यांनी त्याची दखल घ्यावी, ही विनंती.

Leave A Reply

Your email address will not be published.