‘लोकशाही’च्या माध्यमातून ‘लोकशाही’ बळकट करु या !

डॉ. भरत अमळकर यांचे आवाहन : आमदार राजूमामा भोळे यांची विशेष उपस्थिती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तंत्रज्ञानाच्या काळात माणूस माणसापासून दूर जात आहे. जवळ बसलेला माणूस मोबाईलमध्ये गुंतला असून तो त्यातून बाहेर येणे महत्वाचे आहे. दै. लोकशाही विविध माध्यमातून माणसे जोडण्याचे कार्य करीत असून आपण ‘लोकशाही’च्या माध्यमातून देशातील ‘लोकशाही’ बळकट करण्यासाठी हातभार लावू या! असे प्रतिपादन केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनी केले.

दै. लोकशाहीच्या बहुरंगी अशा दिनदर्शिकेचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले त्यावेळी श्री. अमळकर बोलत आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे, आनंद हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, दीपक सुर्यवंशी, लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर, संचालिका शुभांगी यावलकर, सल्लागार संपादक धों.ज.गुरव, व्यवस्थापक सुभाष गोळेसर, वरिष्ठ उपसंपादक दीपक कुळकर्णी, विवेक कुळकर्णी, सुरेश सानप उपस्थित होते. प्रारंभी संचालक राजेश यावलकर यांनी प्रास्ताविकातून दै. लोकशाहीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. अमळकर म्हणाले की, नव्या भारताच्या निर्मितीसाठी लोकशाही बळकट करणे आवश्यक झाले आहे. आजच्या परिस्थिती माणूस माणसापासून लांब जात असल्याने संस्कृती धोक्यात आली आहे. संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिनदर्शिका ही भारतीय संस्कृतीचे एक प्रतिक असून दै. लोकशाहीने आजही धकाधकीच्या काळात हा वारसा जोपासला आहे, हेच नव्या भारताचे सुचिन्ह असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, दिनदर्शिकेच्या माध्यमातून हिंदू सण-उत्सवांची माहिती मिळते. इंग्लिश मिडीयममध्ये शिकणाऱ्या मुलांना हिंदू संस्कृतीमधील दिनविशेष माहित नसते मात्र ते या दिनदर्शिकेच्या माध्यमातून समजण्यास मदत होणार आहे. दै. लोकशाहीच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून त्यातून बलशाली भारत निर्माणाला मदत होत असते. दिनदर्शिका हे लोक जोडण्याचे प्रमुख माध्यम आहे. समाजासाठी काही तरी देण्याचे काम दै. लोकशाही करीत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. डॉ. नेहा भंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार व्यवस्थापक सुभाष गोळेसर यांनी मानले.

दै. लोकशाहीच्या बहुरंगी दिनदर्शिकेचे विमोचन करतांना आमदार राजूमामा भोळे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर, आनंद हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, दीपक सुर्यवंशी, लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर, शुभांगी यावलकर, सल्लागार संपादक धों.ज.गुरव, व्यवस्थापक सुभाष गोळेसर, वरिष्ठ उपसंपादक दीपक कुळकर्णी, विवेक कुळकर्णी, सुरेश सानप.

 

Leave A Reply

Your email address will not be published.