जन कल्याणाची शक्ति गुरूंमध्ये..

0

प्रवचन सारांश  –  4 ऑगस्ट 2022

भारतीय संस्कृतीत ‘कृषी’ आणि ‘ऋषी’ यांना अनन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे.  भगवान महावीर यांचे निर्वाण होऊन शेकडो वर्षांनंतर देखील पंचमआरा, सद्यस्थितीतही त्यांचे विचार अवलंबले जातात. जिनशासन राज्य सुरू आहे.  त्यासाठी साधू-साध्वी यांचे कार्य खूप मोठे आहे. ‘देव’ ‘गुरु’ व ‘धर्म’ यांच्या बद्दल ‘मेरी भावना’ या रचनेत महत्व सांगण्यात आलेले आहे. सर्व जगतचे दुःख दूर करण्याची शक्ती साधू-साध्वी यांच्यात असते. त्यांचे दर्शन, सहवास किंवा त्यांच्या सोबत घालवलेला वेळ, त्यांचे प्रवचन ऐकणे, त्यांच्या शरण जाणे इत्यादी केले तरी दुःख दूर होऊन जाते असे विचार डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर मुनी यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.

हे देखील वाचा :-

स्वार्थ त्याग की कठीण तपस्या..

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री प.पू. पार्श्वचंद्रजी म.सा. अनुप्पेहा ध्यानप्रणेता पु. पदमचंद्रमुनी आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. गुरूंच्या मार्गदर्शन, शरण आल्याने अनेकांचे दुःख दूर झालेले आहेत. जीवनात प्रत्येकाने एक तरी गुरु असणे आवश्यक आहे.  2014 च्या जळगाव येथे झालेल्या चातुर्मास काळात घडलेली सत्यकथा त्यांनी उपस्थित श्रावक- श्राविकांना सांगितली. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्याप्रति आदरभाव ठेवावा अशी शिकवण आजच्या प्रवचनातून श्रावक श्राविकांना देण्यात आली.

प. पू. डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य  पू. धुरंधरमुनी यांनी ‘आगम प्रवचन’ मालिकेत आज सांगितले की, आजचा बहुतांश जनसामान्य वर्ग निद्रिस्त झालेला दिसत आहे. ज्ञानी लोक हे जागृत असतात. लोकांना, श्रावक-श्राविकांना जागृत करण्याचे काम साधू- साध्वी करत असतात. आपण सर्वांनी जागृत असावे. आपल्या दररोज मिळालेल्या वेळेत काही ना काही सत्कार्य करण्यात आपला वेळ सत्कारणी लावावा, असे आवाहन प्रवचनातून करण्यात आले. 4 ऑगस्टपासून तीन दिवसीय स्वाध्याय शिबिर सुरू झाले आहे. त्यात जळगावसह भारतातील अन्य राज्यातून श्रावक श्राविका सहभागी झालेले आहेत.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका  दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here